भारतातील वेगाने वाढणाऱ्या एएमसीपैकी एक असलेल्या एडेलवाईस असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने आज एडेलवाईस nifty psu bond-२०२६ ची घोषणा केली. अशा प्रकारचा हा पहिला निर्देशांक फंड आहे जो निष्क्रीयपणे व्यवस्थापित असेल आणि एएए मुल्यांकित (AAA Rated) पीएसयू बॉण्ड्स आणि स्टेट डेव्हलोपमेंट लोन्स (एसडीएल) मध्ये गुंतवणूक करेल.

या योजनेत ५००० रुपयांपासून गुंतवणूक करता येईल. या फंडची मुदतपूर्तता ३० एप्रिल २०२६ असेल. परिपक्वतेनंतर गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे उत्पन्न परत मिळेल. गुंतवणूकदारांना परताव्याची स्थिरता आणि दृश्यता मिळावी यासाठी फंड परिपक्वतेपर्यंत बॉण्ड्स मध्ये निवेशीत राहण्याचे लक्ष्य ठेवेल. इंडेक्सएशन नंतर २० टक्के दराने कर आकारला जात असल्याने, हा निधी पारंपारिक निवेशाच्या मार्गांच्या तुलनेत अधिक कर-कार्यक्षम असेल,

अभिप्राय द्या!