सुरत येथील कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत असलेली अनुपम रसायन इंडिया लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री करुन निधी उभारणीचा निर्णय घेतला आहे. ही योजना १२ मार्च २०२१ पासून खुली होणार असून १६ मार्च २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल. या योजनेत प्रती शेअर ५५३ रुपये ते ५५५ रुपये असा किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे. आयपीओतून ७६० कोटी उभारले जाणार आहेत. कंपनीचा शेअर बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”)वर सूचीबद्ध होणार आहे.
अनुपम रसायन ही एक अग्रगण्य कंपनी असून ती भारतात कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत आहे. फ्रॉस्ट अँड सुल्लीवन निर्मित आणि प्रकाशित, कंपनीने इश्यूच्या संदर्भात कमिशन व भरणा केला. ही कंपनी दोन प्रकारच्या कार्य परिघात काम करते. त्यापैकी एक लाईफ सायन्सेस असून यामध्ये विशेष रसायनांचा समावेश असलेली उत्पादने तयार करण्यात येतात. ज्यामध्ये अॅग्रोकेमिकल्स, पर्सनल केअर आणि फार्मास्युटिकल; तसेच अन्य विशेष रसायने, विशेष पिगमेंट आणि डाय, पॉलिमर अॅक्टीव्हीटीचा समावेश आहे. कंपनीचे कामकाज भारतातील गुजरातमधील सहा बहुउद्देशीय निर्मिती सुविधाकेंद्रांतून चालते.