क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेडने IPO योजना जाहीर केली आहे. हा इश्यू १५ मार्च रोजी खुला होणार असून १७ मार्च २०२१ रोजी बंद होईल. यासाठी प्रती शेअर १४८८ ते १४९० रुपये इतका किंमत पट्टा निर्धारित करण्यात आला आहे. या योजनेत किमान १० शेअरसाठी गुंतवणूकदारांना अर्ज करता येईल.

या इनिशियल पब्लिक ऑफरिंगमध्ये कंपनीच्या एकूण १५० कोटींचा फ्रेश इश्यू असून एकूण ४५२१४५० पर्यंतच्या इक्विटी शेअरच्या विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश आहे. या ऑफरमध्ये किमान १० इक्विटी शेअर्सच्या एकगठ्ठा खरेदीसाठी व त्यानंतर १० च्या पटीत इक्विटी शेअर्स विकत घेण्यासाठी बोली लावता येईल.

अभिप्राय द्या!