मॅक्स लाइफ इन्शुरन्स कंपनीने आज ‘मॅक्स लाइफ सरल जीवन बिमा’ सादर करत असल्याची घोषणा केली. समजण्यास अतिशय सोप्या आणि साध्या अशा वैशिष्ट्यांसह ग्राहकांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ही नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक प्युअर-रिस्क प्रीमिअम जीवन विमा योजना आहे.
मॅक्स लाइफच्या सरल जीवन बिमा योजनेत १८ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींसाठी किमान पाच लाखांचा आणि कमाल २५ लाखांचा विमा ५ ते ४० वर्षांच्या कालावधीसाठी काढता येतो. ‘मॅक्स लाइफ सरल जीवन बिमा’मध्ये ग्राहकांना रेग्युलर पे, सिंगल पे आणि लिमिटेड पे (५ आणि १० वर्षांचा पर्याय) अशा प्रीमिअमच्या कालावधीचे पर्याय आहेत. तसेच, वार्षिक, सहामाही किंवा मासिक असे प्रीमिअम पेमेंटच्या कालावधीचेही पर्याय उपलब्ध आहेत.