लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेडचा इक्विटी समभागाची प्रारंभिक विक्री योजना आज सोमवारपासून खुली झाली आहे. गुंतवणूकदारांना बुधवार १७ मार्च २०२१ या योजनेत अर्ज सादर करता येतील. किमान ११५ शेअरच्या गठ्ठयासाठी अर्ज करता येईल, असे माहिती पत्रकात म्हटलं आहे. या प्रस्तावाचा किंमत पट्टा प्रती इक्विटी शेअर १२९-१३० रुपये असा निश्चित करण्यात आला आहे.

लक्ष्मी ऑर्गेनिक हे सध्या भारतातील इथीयल एक्सेटेटचे सर्वात मोठे निर्माते मानले जातात. त्यांच्याकडे भारताच्या इथियल एक्सेटेट बाजाराचा सुमारे ३० टक्के हिस्सा आहे. ही कंपनी स्पेशियलिटी इंटरमीजीएटमध्ये विविध प्रकारच्या रसायनांचा पोर्टफोलियो वृद्धिंगत करण्यावर विश्वास ठेवते. ज्यामुळे त्यांनी स्वत:चे विशेषत्व सिद्ध केले आहे. लक्ष्मी ऑर्गेनिक हे भारतात डिकेटीन डेरेव्हेटीव्हजचे एकमेव निर्माते मानले जातात. २०२० च्या आर्थिक वर्षातील महसूलानुसार भारतातील डिकेटीन डेरेव्हेटीव्हजचा अंदाजे ५५ टक्के भाग लक्ष्मी ऑर्गेनिककडे असल्याने त्यांच्याकडे डिकेटीन उत्पादनांचा सर्वात मोठा पोर्टफोलियो आहे.

या कंपनीचे अलेम्बिक फार्मास्युटिकल्स लिमिटेड, डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज लिमिटेड, हेतेरो लॅब्ज लिमिटेड, लौरस लॅब्ज लिमिटेड, मॅकलीओड्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, मायलन लॅबोरेटरीज लिमिटेड, न्यूलँड लॅबोरेटरीज लिमिटेड, सुवेन फार्मास्युटिकल्स, ग्रॅन्यूएल्स इंडिया, यूपीएल लिमिटेड, सिंजेन्टा एशिया पॅसिफिक पीटीई. लिमिटेड आणि सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशा निरनिराळ्या उपभोक्त्यांसोबत दीर्घकालीन संबंध आहेत. त्याचप्रमाणे चीन, नेदरलँड्स, रशिया, सिंगापूर, युनायटेड अरब एमिरात, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासह ३० हून अधिक देशांत कंपनीचे कामकाज विस्तारलेले आहे.

अभिप्राय द्या!