आपल्यासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी कोणत्याही प्रकारचं आरोग्य विमा योजना कवच न घेणाऱ्या अनेकांसाठी करोना महामारीने जागं केलं आहे. रुग्णालयात किती काळासाठी दाखल आहोत यावरुन आधारित रुग्णालयाचा खर्च लाखांच्या घरात असू शकतो. ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना होती त्यांच्यासाठी त्यांची विमा कंपनी रुग्णालयाचं बिल भरत होती. पण ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची विमा योजना नव्हती त्यांना मात्र आपल्याच खिशातून बिल भरावं लागलं. जर तुम्हाला वाढत जाणारं मेडिकल बिल भरण्यासाठी

सेव्हिंगला हात लावायचा नसेल तर अजिबात विलंब न करता लवकरात लवकर पुरेसा आरोग्य कवच खरेदी करा.

कोविड इतक्या लवकर आपल्यातून जाणार नसल्याने विमा नियामक आयआरडीएआयने २०२० मध्ये विमा कंपन्यांना एक्स्लुझिव्ह करोना व्हायरस आरोग्य विमा योजना ऑफर करण्यास सांगितलं होतं. करोना व्हायरल आरोग्य विमा योजनेचे करोना कवच योजना आणि करोना रक्षक योजना असे दोन प्रकार मार्केटमध्ये आहेत. करोना रक्षक योजना खरेदी करण्यासाठी तुम्ही विमा देणाऱ्या कोणत्याही कंपनीशी संपर्क साधू शकता. यामध्ये जीवन विमा कंपनीचाही समावेश आहे.

दोघांमधील सर्वात मोठा फरक म्हणजे करोना कवच योजना ही नुकसानभरपाई-आधारित योजना असल्याने तुम्हाला फक्त रुग्णालयातील बिलाच्या खर्चाचे पैसे परत मिळतात. पण करोना रक्षक योजना निश्चित लाभ योजना असल्याने विमाधारकाला विमा उतरवलेली १०० टक्के रक्कम दिली जाते.

जर तुम्ही अद्यापही आरोग्य विमा योजना घेतली नसेल तर सर्व आघाड्यांवर जोखीम पत्करण्यासाठी चांगल्या हेल्थ कव्हर पोर्टफोलिओचं मूल्यांकन करण्याची वेळ आली आहे.

अभिप्राय द्या!