भारतातील एक आघाडीची कॅज्युअल डायनिंगची चेन असलेल्या (बीएनएचएल) या कंपनीने प्राथमिक बाजारातून निधी उभारणीची घोषणा केली आहे. आयपीओतून कंपनी ४५३ कोटींचा निधी उभारणार आहे. इनिशिअल पब्लिक ऑफर बुधवार २४ मार्च २०२१ रोजी खुली होणार असून २६ मार्च २०२१ रोजी बंद होईल. या ऑफरसाठीचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ४९८ ते ५०० रुपये असा ठरविण्यात आला आहे.

कंपनी आणि टमारा प्रायव्हेट लिमिटेड (टीपीएल) हे विक्रेते समभागधारक बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या (BRLMs) सल्ल्याने अँकर इन्व्हेस्टर्सच्या सहभागाविषयी विचार करू शकतात, जे बिड/ऑफर ऑपरेटिंग दिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी २३ मार्च २०२१ रोजी असेल.

बीएनएचएलने आपले पहिले बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंट २००८ साली सरू केले आणि एसएचएलच्या मालकीची आणि संचलित करण्यात येणारी ५ रेस्टॉरंट्स २०१२ पर्यंत संपादित केली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बीएनएचएलतर्फे सध्या भारतातील ७७ शहरांमध्ये १४७ बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंट्सचे (खुली, तात्पुरती बंद असलेली आणि बांधाकामांतर्गत असलेली समाविष्ट) आणि यूएई, ओमान आणि मलेशिया या ३ देशांमध्ये ६ आंतरराष्ट्रीय बार्बेक्यू नेशन्सचे संचलन करत आहेत.

अभिप्राय द्या!