कर्जवसुली स्थागितीच्या प्रकरणी आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर केला. न्यायालयाने थकीत कर्ज हप्त्यांवर व्याजावर व्याज आकारू नये, असे आदेश दिले आहे. तसेच ज्या बँकांनी व्याजावर व्याज वसुल केले आहे त्यांनी पुढील मासिक हप्त्यामध्ये ते समाोजित करावे (Adjusted in Next EMI) असे सांगून न्यायालयाने आज कर्जदारांना मोठा दिलासा दिला.

गेल्या वर्षी करोना संकटात लोन मोरॅटोरिम सुविधेने कर्जदारांना तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र या सुविधा आणखी काही काळ सुरु रहावी म्हणून काही व्यापारी संघटनांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज मंगळवारी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निर्णय जाहीर केला. ज्यात न्यायालयाने लोन मोरॅटोरिमला मुदतवाढ देण्यास नकार दिला.

अभिप्राय द्या!