समभाग विक्रीला तुफान प्रतिसाद मिळून देखील आज अनुपम रसायनच्या शेअरने गुंतवणूकदारांना निराश केले. आज भांडवली बाजारात अनुपम रसायनच्या शेअरची भांडवली बाजारात नोंदणी झाली. मात्र प्रत्यक्षात इश्यू प्राइसच्या तुलनेत ३ ते ६ टक्के कमी दराने शेअर सूचीबद्ध झाला.

सुरत येथील कस्टम सिंथेसीस आणि विशेष रसायनांच्या निर्मितीत कार्यरत असलेली अनुपम रसायन इंडिया लिमिटेडने प्रारंभिक समभाग विक्री करुन ७६० कोटींचा निधी उभारला. आयपीओत शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांच्या पदरी आज निराशा पडली.

अभिप्राय द्या!