हरिद्वार येथील वायर्स आणि केबल उत्पादक व्ही-मार्क इंडिया लिमिटेडने समभाग विक्री योजनेची घोषणा केली आहे. ही योजना उद्या गुरुवारी २५ मार्च २०२१ रोजी खुली होणार आहे. गुंतवणूकदारांना ३१ मार्च २०२१ पर्यंत समभाग खरेदीसाठी बोली लावता येईल, असे कंपनीने माहिती पत्रकात म्हटलं आहे. या ऑफरसाठीचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ३७ ते ३९ रुपये ठेवण्यात आला आहे. इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध करण्यात येणार आहेत.

हा आयपीओ १० दर्शनी मूल्य असलेल्या एकूण ६०,००,००० शेअर्सचा हा फ्रेश इश्युअन्स आहे. त्याची कॅप किंमत ३९ रुपये आहे आणि त्यांचे एकूण मूल्य २३ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत आहे. या इश्युमध्ये “मार्केट मेकर रिझर्व्हेशन पोर्शन”अंतर्गत सबस्क्रिप्शनसाठी ३,००,००० इक्विटी शेअर्सपर्यंत आरक्षण समाविष्ट आहे. या कंपनीने आयपीओपूर्व राउंड आधीच पूर्ण केला आहे आणि एचएनआय गुंतवणूकदार मधुकर शेठ यांच्याकडून ३२.७६ कोटींच्या मोबदल्यात ८,४०,००० इक्विटी शेअर्सचे आयपीओपूर्व वाटप झाले आहे.

अभिप्राय द्या!