मुदत विमा योजनेचे प्रकार –

लेव्हल टर्म प्लान (Level Term Plan)
मुदत विमा योजनेमधील हा अत्यंत बेसिक प्रकार आहे. ज्याप्रमाणे नावातूनच समजत आहे त्याप्रमाणे पॉलिसीच्या पूर्ण कालावाधीत विम्याची रक्कम निश्चित असते. लेव्हल टर्म प्लानमध्ये कालावधी सुरु असतानाच मृत्यू झाल्यास संपूर्ण विमा रक्कम नॉमिनीला एकत्रित दिली जाते. एक विमाधारक म्हणून पॉलिसीचा कालावधी सुरु असतानाच तुमचं निधन झालं तर नॉमिनिला ठराविक रक्कम मिळणार याची तुम्हाला खात्री असते.

रिटर्न ऑफ प्रीमियम प्लान (Return of Premium Plan)
रिटर्न ऑफ प्रीमियम प्लानमध्ये पॉलिसीधारक पूर्ण कालावधी संपेपर्यंत जिवंत असल्यास प्रीमियम रक्कम परत दिली जाते. या प्लानमध्ये प्रीमियम रक्कम इतर योजना ज्यामध्ये विमाधारकाला मॅच्यूरिटीनंतर काही रक्कम मिळत नाही त्याच्या तुलनेत जास्त असते. पॉलिसीचा कालावधी संपेपर्यंत जिवंत राहिल्यानंतर आपले पैसे परत मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा चांगला प्लान आहे. पॉलिसी कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम नॉमिनीला दिली जातो. यामध्ये प्रीमियम परत दिले जात नाहीत.

इन्क्रिजिंग कव्हर प्लान (Increasing Cover Plan)
इन्क्रिजिंग कव्हर प्लानमध्ये विमा रक्कम पूर्व-निर्दिष्ट रकमेसह किंवा महागाईडच्या आधारे वेळोवेळी वाढत राहते. याचाच अर्थ मृत्यू झाल्यानंतर मिळणारी मूळ रक्कम असू शकत नाही, तर मृत्यू किती वर्षानंतर येतो यावर अवलंबून वाढलेली रक्कम असू शकते. रुपयाची वेळोवेळी घसरण होत असताना अशा योजनांमुळे लाइफ कव्हरचं मूल्य टिकवून ठेवता येतं आणि महागाईनुसार वाढत चाललेली उद्दिष्टं सहज पूर्ण करता येऊ शकतात. यामध्ये पॉलिसीच्या पूर्ण कालावधीत प्रीमियम निश्चित असतो.

डिक्रिजिंग कव्हर प्लान (Decreasing Cover Plan)
वय वाढतं त्याप्रमाणे कुटुबांप्रती असणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्यांमध्येही वाढ होते. मुलांच्या शिक्षणासाठी योग्य वेळी पैसे उपलब्ध असण्यापासून ते आपल्या गैरहजेरीत कुटुंबाचा राहणीमान दर्जा समान ठेवण्यास मदत करण्यासाठी पुरेसा कव्हरेज असणं अत्यंत महत्वाचं आहे.

यामुळेच जेव्हा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आयुष्यात महत्त्वाचे आर्थिक टप्पे गाठायचे असतील त्या कालावधीत पुरेसा कव्हरेज खरेदी करणं चांगलं आहे. जेव्हा ही जबाबदारी येते तेव्हा कव्हरेज कमी करण्याची गरज उद्भवू शकते. अशावेळी डिक्रिजिंग कव्हर प्लान विमा रक्कम मदतपूर्ण ठरु शकतो, कारण यामध्ये विमा रक्कम वेळोवेळी कमी होत राहते.

अशा योजना गृह कर्जासाठीही उपयुक्त ठरतात जिथे मुख्य थकबाकी वेळोवेळी कमी होत असते. पण जर तुम्ही एखाद्या विशिष्ट हेतूसाठी अशा योजना विकत घेत असल्यास, लेव्हल टर्म प्लानच्या मार्फत तुम्चायाकडे पुरेसं कव्हरेज असेल हे सुनिश्चित करा.

मासिक उत्पन्न कव्‍हर योजना (Monthly Income Cover Plan)
मुदत विमान योजनेत पॉलिसीच्या कालावधीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनिला संपूर्ण विमा रक्कम एकत्रित दिली जाते. पण अशा पद्धतीने एकत्रित मिळालेली रक्कम नॉमिनीकडून योग्य पद्धतीने न वापरली जाण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत मासिक उत्पन्न कव्‍हर योजना फायदेशीर ठरते. यामधून कुटुंबाला उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून विमा राशी मिळण्यास मदत होते.

यामधील काही योजनांमध्ये लाइफ कव्हरचा काही भाग नॉमिनीला एकरकमी दिला जातो तर नियमित मासिक उत्पन्न शिल्लक रकमेवर दिले जाते. काही योजनांमध्ये लाइफ कव्हरच्या संपूर्ण रकमेवर नियमित मासिक उत्पन्न मिळण्याचा पर्याय दिला आहे, तर काही योजना आधी ठरवलेल्या दराने मासिक उत्पन्न वाढविण्याची ऑफर देतात.

Leave a Reply