बल्क एसएमएस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४० कंपन्यांमध्ये आघाडीच्या बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा समावेश आहे. भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक या प्रमुख बँकांचा समावेश आहे. या बँकांना आणि एलआयसीला नविन नियमांचे पालन करण्यासाठी ट्रायने ३१ मार्च २०२१ ची डेडलाईन दिली आहे.

वारंवार सूचना देऊनही बल्क एसएमएस सेवा सुरूच ठेवणाऱ्या देशभरातील ४० डिफॉल्टर कंपन्यांची यादी जारी केली आहे. या कंपन्यांनी ३१ मार्च अखेर नियमांचे पालन केले नाही तर एप्रिलपासून एसएमएस सेवा खंडीत करण्याचा इशाराच दूरसंपर्क नियमकाने दिला आहे.

अभिप्राय द्या!