मागील वर्षभरात करोनाचा प्रभाव असल्याने म्युच्युअल फंड योजनांच्या कामगिरीवर देखील परिणाम झाला. मात्र या प्रतिकुल परिस्थितीत देखील महिंद्रा मनुलाईफ मल्टी कॅप फंडाने जबरदस्त कामगिरी केली आहे. महिंद्रा मनुलाईफ मल्टी कॅप ग्रोथ फंडाने एक वर्षात गुंतवणूकदारांना ७९ टक्के परतावा दिला आहे.
मल्टी कॅप फंडांच्या श्रेणीत सर्वाधिक परतावा देण्यामध्ये महिंद्रा मनुलाईफ मल्टीकप ग्रोथ फंड अव्वल स्थानी आहे. एक वर मुदतीत या योजनेने गुंतवणूकदारांना ७९ टक्के परतावा दिला. तर दोन वर्षांच्या कालावधीत या योजनेतून २०.९ टक्के परतावा मिळालं आहे. तर तीन वर्षाचा विचार करता या योजनेतून गुंतवणूकदारांना मुदत ठेवीपेक्षाही चांगला परतावा मिळाला आहे. महिंद्रा म्युच्युअल फंडाकडून मिडकॅप शेअर्सवर आधारित हि योजना ११ मे २०१७ रोजी बाजारात दाखल केली होती.