नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात किमान सहा कंपन्या प्राथमिक बाजारात आपले नशीब आजमावणार आहेत.

सरत्या आर्थिक वर्षात भांडवली बाजारात तब्बल ११ IPO आले होते.

एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मायक्रोटेक डेव्हलपर्स ही कंपनी आयपीओ घेऊन येणार आहे. ७ एप्रिल रोजी कंपनीची समभाग विक्री खुली होणार असून ९ एप्रिलपर्यंत अर्ज करता येईल. किमान २५०० कोटी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

यानंतर आरोग्य सेवा क्षेत्रात काम करणारी तेलंगणामधील केआयएमएस या कंपनीकडून ७०० कोटीच्या आयपीओसाठी सेबीकडे प्रस्ताव पाठवला आहे. यात किमान २०० कोटींचे ताजे शेअर इश्यू केले जाणार आहेत. याच महिन्यात कंपनीकडून आयपीओ जाहीर होणार आहे.

सेव्हन आयलॅंड शिपिंग या कंपनीकडून ६०० कोटींचा आयपीओ आणला जाणार आहे. या योजनेला नुकताच सेबीकडून परवानगी देण्यात आली. मालवाहतूक करणाऱ्या या मुंबईच्या कंपनीकडे २० जहाजे आहेत.
आधार हौसिंग फायनान्स ही गृह वित्त पुरवठा क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीचा ७३०० कोटींचा आयपीओ एप्रिल महिन्यात बाजारात धडकणार आहे. या कंपनीमध्ये ब्लॅकस्टोन कंपनीची मोठी गुंतवणूक आहे.
याशिवाय लवकरच डोडला डेअरी या कंपनीकडून आयपीओ जाहीर केला जाणार आहे. हैदराबादमधील या कंपनीकडून प्राथमिक बाजारातून ५० कोटींचे नवे शेअर विक्री केले जाणार आहे.

अभिप्राय द्या!