macrotek developers लिमिटेड या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनीने भांडवली बाजारातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीची समभाग विक्री योजना बुधवार ७ एप्रिल २०२१ रोजी खुली होणार असून ९ एप्रिल २०२१ रोजी बंद होईल. आयपीओतून २५०० कोटींचा निधी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
या ऑफरसाठीचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ४८३-४८६ रुपये निश्चित केला आहे. कंपनी ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्स आणि बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या (“मॅनेजर्स”) सल्ल्याने अँकर इन्व्हेस्टर्सच्या सहभागाविषयी विचार करू शकतात. फ्रेश इश्युमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी (कर्मचारी आरक्षण पोर्शन) ३० कोटीपर्यंतच्या शेअर्सचे आरक्षण आहे आणि निव्वळ इश्यू (म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेला इश्यु वजा करून) खालीलप्रमाणे असेल. क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्स (क्यूआयबी) ५० टक्क्यांहून जास्त असणार नाही. नॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्स १५ टक्क्यांहून अधिक असणार नाहीत आणि किरकोळ स्वतंत्र बिडर्स ३५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाहीत.