लिमिटेड या भारताच्या दुग्धउत्पादन क्षेत्रातील आघाडीच्या एफएमसीजी कंपनीने इक्विटी शेयर्स, फॉरिन करन्सी कन्व्हर्टिबल बाँड्सचे (एफसीसीबी) (परकीय चलन परिवर्तनीय रोखे) प्राधान्य वाटप आणि परिवर्तनयी समभागांच्या वाटपातून १३६ कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास २६ एप्रिल २०२१ रोजी होणार असलेल्या आगामी विशेष सर्वसाधारण सभेत (ईजीएम) समधारकांची तसेच नियामक मंजुरी मिळणे प्रस्तावित आहे.

प्रस्तावित गुंतवणुकीमधे १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या ६७,५६,७५७ इक्विटी शेयर्सचे १११ रुपये (प्रती शेयर १०१ रुपये प्रीमियमसह) दर्शनी मूल्यासह प्राधान्य वाटप केले जाणार असून त्याद्वारे एकूण ७५ कोटी रुपये उभारले जातील. त्याशिवाय या प्रस्तावित गुंतवणुकीचा एक भाग म्हणून आयएफसीला लागू कायद्यानुसार, खासगी प्लेसमेंटद्वारे प्रती शेयर १४५ रुपये आणि रिडम्प्शनसाठी ५ वर्षांच्या मुदतीसह ११ दशलक्ष डॉलर्सपर्यंतचे फॉरिन करन्सी कन्व्हर्टिबल बाँड्सच्या (एफसीसीबी) सबस्क्रिप्शन घेण्याची ऑफर दिली जाईल.

अभिप्राय द्या!