कालच माझे एक जुने सहकारी व मित्र भेटले . गेले सहा महिने ते आपल्या परदेशात्याल्या मुलीकडे गेले असल्याने तश्या बऱ्याच गप्पा झाल्या . तिकडे नवीन काय ? हे विचारल्यावर  ते म्हणाले  NSD .

म्हणजेच तिकडे हल्ली “ नॉन spending डे “ प्रत्येक कुटुंबात साजरा होतो . हा दिवस दर आठवड्यातून एकदा किंवा दर महिन्यातून एकदा प्रत्येक कुटुंब साजरा करते . विस्तृतपणे विचारल्यावर त्याने सांगितले कि या दिवशी हा दिवस साजरा करणारे कुटुंब काहीही खरेदी करीत नाही .  हे ऐकून मलाही चांगले वाटले .

आपल्याकडे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातसुद्धा नको तेवढ्या वस्तू खरेदी केल्या जातात हे मीही इकडे पाहतोच आहे .

किचनच्या ओट्यावर दोन-दोन गॅस शेगड्या (घरात माणसं चार!), असंख्य कपबशा, ग्लासेस याखेरीस शू रॅकमध्ये चप्पल-बुटांचे प्रदर्शन मांडता येईल एवढे जोड भरलेले असतात. बेडशीट, चादरींच्या थप्प्या एकमेकांना पांघरून कपाटात पडलेल्या! शिवाय घरात कोच, खुर्च्या, टेबल, कार्पेट, टीव्ही, म्युझिक सिस्टीम, सीडी यांची गर्दी. खाली दारात घरात असलेल्या लोकांपेक्षा जास्त सायकली, स्कूटर, मोटारसायकली आणि मोटार वगैरे.

परदेशात नॉन spending डे ही संकल्पना येण्यामागचे कारण पैसे वाचवणे हे नसून अनावश्यक खरेदी थांबवणे हेच आहे.

आपणसुद्धा खर्च करताना

1) काय पाहिजे आणि काय गरज आहे, याचा प्रथम विचार करा, 2) खर्चाला आमंत्रण देणारा रस्ता बदला. क्रेडिट कार्डला सुटी द्या, 3) सुटीच्या दिवशी जमल्यास घरात राहणे पसंत करा, 4) बाहेरून अन्नपदार्थ आणू नका, 5) तिकीट काढून सिनेमा बघण्याऐवजी सीडी आणून बघा, 6) पुस्तकांसाठी लायब्ररी लावा, 7) कामाच्या ठिकाणी डब्या न्या, 8) काही कंपन्या खर्चावर रिबेट पॉइंटस देतात, ते जरूर घ्या, 9) ब्रॅंडेड वस्तू महाग असतात; पण काही बिनब्रॅंडेड वस्तूसुद्धा चांगल्या आणि स्वस्त असतात, त्याचा विचार करा, 10) सेल, प्रदर्शने यापासून एखाद्यावेळी तरी दूर राहा, 11)  घरी असलेल्या वस्तूंवरूनच आपली गरज भागवून बघा, 13) “नो’ म्हणायला शिका. व

अशी झालेली बचत अनेक वंचित व दुर्बल घटकांना देण्यासाठी  UTI चे cansereve फंड किंवा HDFC चा कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करणारा फंड आहेच !!

अभिप्राय द्या!