मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) या दोन्ही आघाडीच्या भांडवली बाजारांनी गुंतवणूकदारांना, तरल आणि रोकडसुलभ नसलेल्या सुमारे ३०० समभागांबाबत विशेष खबरदारीचा इशारा दिला आहे. अशा समभांगांमध्ये व्यवहार करण्यापासून गुंतवणूकदारांना परावृत्त करणारे परिपत्रक या भांडवली बाजारांनी काढले आहे. बीएसई २९९, तर एनएसई १३ समभागांची सूचीही दिली असून, ती दोन्ही बाजारांच्या संकेतस्थळांवर पाहता येईल.

अत्यंत तुरळक व्यवहार होणाऱ्या समभागांची टिप्स वजा भूलथापांना बळी पडून खरेदी केली गेली, तरी ते विकते वेळी कोणी खरेदीदार पुढे येणार नसल्याने गुंतवणूकदारांना नुकसान सोसावे लागेल, असा या इशाऱ्याचा अर्थ आहे.

अभिप्राय द्या!