दोन वर्षांपूर्वी आमच्या शेजारच्या एका कुटुंबामध्ये दोन कर्तीसवर्ती मुले कामाच्या ठिकाणी जात असताना मोटर अपघाताने निधन पावली. या कुटुंबात नव्यानेच नोकरीला लागलेले हे दोन सख्खे भाऊ नोकरीच्या ठिकाणी दररोज जात असत. म्हणजेच जाण्यायेण्याचा रस्ता त्यांच्या कायमचा परिचयाचा होता. पण अपघात कधी सांगून होत नाही.कामाच्या जागेवर पोहोचण्यापुर्वी मोटरसायकला ट्रकचा धक्का बसला व काही कळायच्या आत होत्याचे नव्हते झाले.

यांच्या घरात निव्वृत्तीला आलेले आईवडील व यापैकी एका भावाचे लग्न झाल्यामुळे त्याची लहान मुलगी व पत्नी पूर्णपणे अवलंबून असलेली माणसे आहेत. या अपघातामुळे या कुटुंबावर खूपच वाईट प्रसंग ओढवला गेला.

असा प्रसंग कोणत्याही कुटुंबावर येऊ नये अशी सर्वांची इच्छा असते. पण अपघात हा “अपघात” असतो. त्यामुळे घरातल्या कर्त्या व्यक्तीने आपल्यावर अवलंबून असलेल्या माणसांची काळजी अर्थात “आर्थिकदृष्ट्या” घेणे आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यावश्यक असते. यासाठी सध्या बहुतांशी सर्वजण “जीवन विमा” हाच पर्याय निवडताना दिसतात. पण जीवनविम्याचा पर्याय निवडताना अनेक बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.

माझ्या ओळखीत एका व्यावसाईकाने अनेक प्रतिनिधींकडून खरेदी केलेल्या विम्याचा दरमहा हप्ता रु.१ लक्ष पेक्षाही जास्त आहे. या व्यक्तीची  इतर कोणत्याही प्रकारची  आर्थिक गुंतवणूक नाही. एखाद्यावेळेस या व्यक्तीला अपघातामुळे अपंगत्व आल्यास हप्ते भरणे थांबू शकते व हप्ता न भरला गेल्यास विमा policy बंद पडू शकते याचा विचार हप्त्याची रक्कम ठरविताना केलला दिसत नाही.

म्हणून आपल्या वरच्या सर्व जबाबदाऱ्या ओळखून या व्यक्तीने जर term plan स्विकारला असता तर त्याचे आर्थिक संरक्षण व्यवस्थितरित्या  कमी खर्चात झाले असते. व उर्वरित रक्कम आपली आर्थिक ध्येये ठरवून वेगवेगळ्या म्युच्युअल फंड मध्ये SIP द्वारे गुंतवणूक करण्याचे ठरविले असते तर या दरमहा १ लक्ष रुपयांचे मूल्य २० वर्षांत रु.७.६५ कोटी झाले असते. यामुळे  term plan अंतर्गत भरलेली रक्कमेपोटी काहीही परतावा मिळाला नाही तरी चालू शकते. तसेच ULIP(unit link insurance Plan) अंतर्गत जीवनविमा व वृद्धी हा पर्याय निवडून सुद्धा भरलेल्या रक्कमेची चांगल्या प्रकारे वृद्धी झालेली पाहता येते.

आर्थिक ध्येये व जबाबदाऱ्या अर्थासल्लागाराच्या सल्ल्याने ठरविल्यास कमी खर्चामध्ये, संरक्षण, कुटुंबियांचे हित व संपत्तीवृद्धी या सर्व बाबी लीलया प्राप्त करता  येतात हेच महत्त्वाचे!

अभिप्राय द्या!