गेल्या वर्षी भारतात धडकलेल्या करोना संकटाने भांडवली बाजाराची धूळदाण उडवली होती. सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण झाली. त्याचे पडसाद म्युच्युअल फंड उद्योगावर देखील उमटले होते. मात्र त्यानंतर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ओघ वाढू लागला. वर्षभर म्युच्युअल फंडाच्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली आहे. क्रिसिल या पत मानांकन संस्थेच्या अहवालानुसार मार्च महिनाअखेर म्युच्युअल फंडातील एकूण मालमत्ता ३१.४३ लाख कोटी इतकी झाली आहे.

सर्वच म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक ओघ मागील वर्षभरात वाढला. त्यामुळे म्युच्युअल फंडाची एकूण संपत्ती ४१ टक्क्यांनी वाढली. मागील वर्षभरात २.०९ लाख कोटींची गुंतवणूक झाली. ओपन एंडेड डेट फंडामधून वर्षभरात ५२५२८ कोटीची गुंतवणूक काढून घेण्यात आली.

Leave a Reply