म्युच्युअल फंड उद्योगातील मल्टी असेट फंडाची श्रेणी बघितली तर यात आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund  लोकप्रिय फंड ठरत आहे. या फंडाचे व्यवस्थापन एस. नरेन करत असून फंडाची कामगिरी या श्रेणीत सरस ठरली आहे. सर्वसाधारणपणे मल्टी अ‍ॅसेट फंड हे १० ते ८० टक्के समभागसंलग्न गुंतवणूक करतात. रोख्यांमध्ये १० ते ३५ टक्के आणि गोल्ड ईटीएफमध्ये १० ते ३५ टक्के गुंतवणूक करतात. तर REITs आणि InvITS मध्ये शून्य ते १० टक्के गुंतवणूक प्रमाण असते.

या श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी असेट फंडाने दमदार कामगिरी केली आहे.  एक वर्षाचा विचार करता या फंडाने ६१.६ टक्के परतावा दिला तर या श्रेणीचा सरासरी ४२.४४ टक्के परतावा होता. ३ वर्षांत आयसीआयसीआय मल्टी फंडाने १०.०४ तर ५ वर्षांत १४.८ टक्के परतावा दिला आहे. जो या श्रेणीच्या तुलनेत सरस आहे.

समभागांचे मूल्यांकन महागल्यावर ही योजना तेल, सोने, चांदी यांसारख्या कमॉडिटीजमध्ये आपली गुंतवणूक वाढवते, जेणेकरून पोर्टफोलिओचा परतावा चांगला राखला जातो. सद्य:परिस्थितीत अर्थव्यवस्थेत चांगली सुधारणा होत असल्याने या योजनेची समभागांमधील गुंतवणूक जास्त आहे. ३१ मार्च २०२१ अखेर फंडाची समभागसंलग्न गुंतवणूक ७७.७ टक्के राहिली आहे.

सध्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. ३१ मार्च २०२१ अखेर या योजनेतील निधी पैकी ७७.७ टक्के निधी इक्विटीमध्ये गुंतवण्यात आला आहे. जो निर्धारित ८० टक्के गुंतवणूक मर्यादेच्या जवळपास आहे. मागील काही महिने महत्वाच्या शेअरला पसंती दिली जात आहे. पोर्टफोलिओमध्ये बँक, ऊर्जा, टेलिकॉम आणि मेटल या चार आघाडीच्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे.

हा फंड चांगला परतावा देत असून या फंडाचे फंड मॅनेजर सुद्धा अत्यंत संयंमी असून तारतम्याने विचार करून गुंतवणूक करण्यात माहीर आहेत ! म्हणून आपण आपल्या गुंतवणुकीसाठी या फंडाचा जरूर विचार करावा !!

 

अभिप्राय द्या!