मायक्रोटेकची समभाग विक्री योजना ७ एप्रिल ते ९ एप्रिल २०२१ दरम्यान सुरु होती. आयपीओतून २५०० कोटींचा निधी उभारण्याचा कंपनीचे नियोजन होते. या ऑफरसाठीचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ४८३-४८६ रुपये निश्चित करण्यात आला होता. या फ्रेश इश्यूमधून संकलित होणारी रक्कम कंपनीच्या १५०० कोटीपर्यंतच्या एकूण थकित कर्जाची कपात करणे ३७५ कोटीपर्यंत जमीन संपादन किंवा जमीन विकास हक्क संपादित करणे आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्यात येईल, असे कंपनीने म्हटलं होते.

मायक्रोटेकचा शेअरची आयपीओतील इश्यू प्राइसच्या तुलनेत १० टक्के सवलतीमध्ये नोंद झाली. मायक्रोटेकचा शेअर ४३९ रुपयांवर सूचीबद्ध झाला. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले.

अभिप्राय द्या!