बीएनपी परीबास असेट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही बीएनपी परीबास असेट मॅनेजमेंटची भारतीय शाखा असून त्यांच्या वतीने बीएनपी परीबास फंड्स अॅक्वा फंड ऑफ फंडच्या नवीन फंडाची घोषणा केली आहे. ही एक ओपन-एन्डेड फंड ऑफ फंड स्कीम असून हिची गुंतवणूक बीएनपी परीबास फंड्स अॅक्वा (लक्स) युनिटमध्ये करण्यात येते. जो एक अंडरलाइंग फंड असून त्याचे उद्दिष्ट हे जागतिक कंपन्यांत गुंतवणुकीचे असते. या कंपन्या वाढत्या ग्लोबल वॉटर वॅल्यू चेनचा भाग असतात.

गुंतवणूकदारांना या एनएफओमध्ये ३० एप्रिल २०२१ पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

जगभरातील कंपन्यांमध्ये अंडरलाइंग फंडची गुंतवणूक चालते, ज्याद्वारे पाणी आणि त्याच्याशी संबंधी क्षेत्रात (जसे की, पाण्याशी निगडीत पायाभूत सुविधा, जल प्रक्रिया, तंत्रज्ञान बचत आणि पुनर्चक्रण, देखभाल आणि जल वहन जाळे आणि उपयुक्तता देखभाल व नवनिर्माण) दीर्घकालीन मॅक्रो इकनॉमिक थीमला संबोधून उत्पादन आणि सेवांच्या माध्यमातून त्यांच्या अंडरलाइंग रेव्हेन्यूच्या २० टक्क्यांहून अधिकची निर्मिती करण्यात येते. अशा कंपन्या दोन्ही, विकसनशील आणि विकसीत देशांमध्ये समृद्ध होत आहेत, त्या गुंतवणूकदारांना भांडवलाच्या दृष्टीने गुंतवणुकीचे चांगले पर्याय देऊ करत आहेत. यामधील समाविष्ट कंपन्या या लहान सर्जनशील  असू शकतात किंवा बड्या सुस्थापित देखील असतात.

पाणी हा घटक वेगाने सर्वात अमूल्य स्त्रोत ठरतो आहे आणि आगामी दशकांत या घटकाशी संलग्न पायाभूत सुविधेत महत्त्वपूर्ण गुंतवणुका झालेल्या दिसतील. हा फंड भारतीय गुंतवणूकदारांना वैश्विक जलसंबंधी व्यवसायात वॅल्यू चेनमध्ये गुंतवणुकीची संधी देतो.

अभिप्राय द्या!