गेली आठवडाभरात देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड हानी केली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख तीन लाख रुग्णांवर गेला आहे. काही राज्यांनी दोन आठवड्यांचा कडक लाॅकडाउन लागू केला आहे. तर देश पुन्हा एकदा कठोर टाळेबंदीच्या उंबरठ्यावर आहे. तसे झाल्यास रिझर्व्ह बॅंकेकडून देखील कर्जदारांच्या दृष्टिने मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी करोना संकटाने कोंडीत सापडललेया कर्जदारांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला होता. अर्थ मंत्रालयाच्या निर्देशांनुसार रिझर्व्ह बँकेने बँकांना कर्ज वसुली स्थगित करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाचा कोट्यवधी कर्जदारांना फायदा झाला होता. यामुळे आताही तशा प्रकारे कर्जदारांना दिलासा देणारा निर्णय आरबीआयकडून घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply