सामान्य ग्राहकांना स्टेट बँकेतील एटीएम व्यवहारावर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नसून केवळ मोबाईल वॉलेटवरुन व्यवहार करणाऱ्यांना २५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे, असे स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे.
येत्या १ जूनपासून ‘एसबीआय’च्या ग्राहकांना मोबाईल वॉलेटच्या सहाय्याने एटीएममधून पैसे काढणे शक्‍य होणार आहे. मात्र प्रत्येक व्यवहारावर२५रुपये शुल्क आकारले जाणार  आहे. याशिवाय, ग्राहकांना चेक बुक, एटीएम कार्ड्स देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात बदल करण्यात आला आहे. चेकबुकमधील चेकच्या संख्येनुसार शुल्कात बदल होईल. मात्र, एटीएम कार्ड देताना पहिले कार्ड मोफत मिळणार आहे.
मात्र, बेसिक बचत खाते असणाऱ्या ग्राहकांना महिन्यातून चार वेळा एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. त्याचप्रमाणे इतर सर्व बचत खातेधारक आधीसारखेच एटीएममधून 8 व्यवहार मोफत करु शकतात. निमशहरी भागात एटीएममधून १० व्यवहार मोफत करता येणार आहेत. बिझनेस करस्पॉंडन्टच्या माध्यमातून वॉलेट्‌समध्ये एक हजार रुपये भरल्यास त्यावर 0.25 टक्के सेवा शुल्क (किमान 2 ते 8 रुपये) अधिक सेवाकर आकारला जाणार आहे. वॉलेटमधून दोन हजार रुपये काढताना त्यावर 2.50 टक्के सेवा शुल्क (किमान 6 रुपये) अधिक सेवाकर आकारले जाणार आहे.

अभिप्राय द्या!