गेल्याच आठवड्यात भारतीय क्रिकेट संघातून ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेला क्रिकेटिअर “वॉशिंग्टन सुंदर” यांच्या संदर्भात एक बातमी वाचनात आली.
आपल्या भारतीय संघातील या खेळाडूला “PUMA” कंपनीचा ब्रॅंड अॅम्बेसडर म्हणून नेमण्यात आले आहे.त्याचबरोबर Anchor या विद्युत उपकरण कंपनीचा ब्रॅंड अॅम्बेसडर म्हणून त्याचीच नेमणूक करण्यात आली आहे.
ही नेमणूक करताना “वॉशिंग्टन सुंदरमध्ये” त्या दिग्गज़ कंपन्यानी काय बरे पाहिले असेल ?
माझ्या मते ऑस्ट्रेलियात खेळताना त्याने दाखविलेला *सातत्यपणा, संघ आयोजकानी सोपवविलेली जबाबदारी योग्यरित्या पूर्ण करण्यासाठी दिलेले लक्ष, संघहित जोपासण्याची प्रवृत्ती आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या लिमिटेशन्स ओळखून दिलेल्या जबाबदा-या योग्य पद्धतीत पार पाडण्याची प्रवृत्ती * की ज्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला त्यांच्याच मायभूमीत नमवू शकला !
या खेळाडूचे आजचे वय लक्षात घेता या दिग्गज कंपन्यानी त्याच्यावर टाकलेला विश्वास हा ह्या बातमीमधील सगळ्यात महत्वाचा भाग ठरतो.
असाच विश्वास आपण *शेअर बाजारामध्ये * शेअरची खरेदी करताना दाखविल्यास आपल्या गुंतवणूकीचे सुद्धा अल्पकालावधीत सोन्यात रुपांतर झालेले आपण स्वतः पाहू शकतो.
गेल्या वर्षभरातील म्हणजेच कोरोना काळातील सेन्सेसची हालचाल कशी आहे ती पाहा. कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी सेन्सेस ४२ हजारच्या पातळीवर होता. गेल्यावर्षी मार्च अखेरीला सेन्सेसची न्यूनतम पातळी ही २६ हजारच्या जवळ पास होती, आणि आज हाच सेन्सेस ४८ हजाराच्या पुढे आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत State Bank चा शेअर 152/- रुपये Tata motors शेअर 68/- रुपये HDFC BANK चा शेअर 860/- रुपये BAJAJ FINANCE चा शेअर 1800/- रुपये INDUSINDBANK चा शेअर 300/- रुपयांच्या आसपास आलेला मी स्वतः पाहिलेला आहे.

*३० रुपयांची “भेळ” खाण्यापेक्षा BHEL * या कंपनीचा शेअर घ्यावा असे आम्ही गंमतीने सुचविले होते.

हे विस्तृतपणे लिहिण्याचे कारण वर नमूद केलेल्या कंपनीमध्ये आपण गेल्यावर्षी १,००,०००/ ते १,५०,०००/- रुपये गुंतविलेले असते तर आज त्याचे मूल्य ३ लक्ष रुपयांपेक्षा जास्त झाले असते. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक कायम स्वरुपात धोकादायक असते असे नाही, हे मला सुचवायचे आहे. अर्थसंकल्पातील कंपनी कायदे, Antidumping डयुटी आणि “आत्मनिर्धार भारत” या घोषणाद्वारे भारतीय अर्थव्यवस्था एका प्रायोगिक चाकोरीबाहेर जाऊन जागतिक सत्तेमध्ये आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यात निश्चितपणे यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहे.

LIC चा IPO,AIR INDIA चे निर्गुतवणुकीकरण हे यावर्षी होणार हे निश्चित आहे.त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर वर “Puma” कंपनीने विश्वास दाखविला तसाच विश्वास आपल्यासारख्या गुंतवणूकदराने भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगले शेअर खरेदी करून दाखविल्यास आपणही आपली आर्थिक स्वप्ने साकारू शकू.
आज रोजी HDFC GROUP , TATAGROUP, MARICO, RELIANCE INDUSTRIES, HAVELLS, RALLIES या कंपन्यांचे शेअर आपल्या शेअर बाजारात “वॉशिंग्टन सुंदर ” आहेत असे समजूया आणि खरेदीचे नियोजन करूया !
या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास कार्यालयीन वेळेत आमच्याशी संपर्क साधावा असे ही सुचविण्यात येत आहे.
प्रदिप जोशी – 9422429103

अभिप्राय द्या!