भारतातील वित्तीय आणि करविषयक मार्गदर्शन करणाऱा (Fintoo) या आघाडीचा मंच ग्राहकांसाठी डिजीटलविषयक सेवेचा अनुभव प्रदान करण्यास सज्ज झाला आहे. हा अनोख्या प्रकारचा वित्तीय आणि करबचत विषयक मंच हा प्रामुख्याने स्वयंचलित असे नियोजन करणारा मंच आहे. त्यात ग्राहकांचे उद्दीष्ट पूर्ण करणे, निधीची आवकजावक, निवृत्तीविषयक नियोजन, जोखीम, खर्चाचे व्यवस्थापन करणे आदी महत्वाची वैशिष्टे त्यात आहेत. आपली उद्दीष्टे आणि आपली संपत्ती यांचा एकमेकांशी व्यवस्थित ताळमेळ करणारे हे उत्तम साधन असून ते अतिशय सुनियोजितपणे गुंतवणूकीचे करत जाते.

या मंचावर नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या AI-Advisor या नवीन पर्यायाआधारे ग्राहकांना त्यांचे वित्तीय नियोजन मानवी हस्तक्षेपाविना करण्यास मदत करणे हा हेतू आहे. या नव्या पर्यायात ग्राहकांची अर्थविषयक माहिती तसेच खासगी माहिती सुरक्षित ठेवली जाते. फक्त ग्राहकच त्याची माहिती पाहू शकतो, तिचे विश्लेषण करु शकतो आणि स्वतः योग्य निर्णय घेऊ शकतो.

अभिप्राय द्या!