गेल्या एक वर्षात म्युच्युअल फंडाच्या मिड कॅप योजनेने गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. आघाडीच्या पाच म्युच्युअल फंड घराण्यांच्या मिड कॅप योजनांनी गेल्या वर्षात ७० टक्क्यांहून अधिकचा लाभ मिळवून दिला आहे. यात आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने सर्वाधिक ८६ टक्के परतावा दिला आहे.
आघाडीच्या मिड कॅप फंडांच्या परताव्याचा विचार केल्यास अर्थलाभ डॉटकॉमच्या आकडेवारीनुसार आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मिड कॅप फंडाने १ वर्षात ८६.१८ टक्के परतावा दिला आहे. निप्पोन इंडिया ग्रोथ फंडाने ७४.१६ टक्के, अॅक्सिस मिड कॅप फंडाने ५७.६२ टक्के, कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाने ७९.८६ टक्के, डीएसपी मिड कॅप फंडाने ५७.४० टक्के आणि एचडीएफसी मिड कॅप अपॉर्च्युनिटीज फंडाने ७५.१९ टक्के परतावा दिला आहे.
यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क करावा !! 9422429013