‘पीपीएफएएस’ म्युच्युअल फंडाने पराग पारीख कंझर्वेटिव हायब्रिड फंड योजनेची घोषणा केली. या योजनेचे उद्दिष्ट प्रामुख्याने डेट व मनी मार्केट उत्पादनांमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून नियमित उत्पन्न निर्माण करणे हे आहे. एकूण गुंतवणूकीचा एक भाग इक्विटी व इक्विटीशी संबंधित उत्पादने तसेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स/इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्समध्ये (आरईआयटीज/इनव्हीटीज) गुंतवून उत्पन्न निर्माण करणे व भांडवल अधिमूल्यनाचाही प्रयत्न ही योजना करणार आहे.
ही गुंतवणूक योजना ७ मे २०२१ रोजी खुली होणार असून २१ मे २०२१ रोजी बंद होईल. या योजनेत किमान ५००० रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. त्यापुढे १ रुपयांच्या पटीत कितीही गुंतवणूक करता येईल.
युनिट्स उपलब्ध झाल्याच्या तारखेपासून १० टक्के युनिट्सवर कोणत्याही प्रकारचा एग्झिट लोड आकारला जाणार नाही. मात्र, १० टक्क्यांहून पुढील युनिट्स उपलब्धतेच्या तारखेपासून एका वर्षात रिडीम केल्यास त्यावर १ टक्का लोड आकारला जाईल. युनिट्स उपलब्ध झाल्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर रिडम्प्शन झाल्यास त्यावर एग्झिट लोड आकारला जाणार नाही