दक्षिण भारतातील आघाडीची सिमेंट उत्पादक कंपनी असलेल्या penna cement या कंपनीने इक्विटी शेअरच्या विक्रीतून १३०० कोटींचा निधी उभारण्याचे निश्चित केले आहे. त्याशिवाय प्रवर्तक विक्रेते समभागधारकांकडून २५० कोटींचे समभाग विक्री असा एकूण १५५० कोटींचा प्रारंभिक समभाग विक्री योजनेची ( IPO) घोषणा केली आहे.

या निधीतून उभ्या राहणाऱ्या रकमेचा विनियोग ५५० कोटींची कंपनीची काही देणी चुकती करण्याकरिता, त्याशिवाय त्यांच्या केपी लाईन II प्रोजेक्टकरिता भांडवली खर्च आवश्यकतेकरिता १०५ कोटी, तलारीचेरूवू येथे कच्चे ग्राइंडिंग आणि सिमेंट मिल अद्ययावत करण्याकरिता ८० कोटी तसेच ११० कोटी आणि १३० कोटी तलारीचेरुवू आणि तंदूर येथे वेस्ट हिट रिकव्हरी प्लांटकरिता व सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणासाठी वापरण्यात येईल, असे कंपनीने माहितीपुस्तकात म्हटलं आहे.

अभिप्राय द्या!