Axis Global Innovation Fund Of Fund
हा NFO १० मे ते २१ मे पर्यंत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे.

या आठवड्यात किंबहुना या महिन्यात साधारणता: ८ ते १० NFO बाजारामध्ये वेगवेगळ्या फंड हाउसेसनी उपलब्ध केले असून त्यातला हा NFO थोडा वेगळा असून यातील गुंतवणूक आपल्याला *भरघोस परतावा देऊ * शकते असे ब-याच तज्ञ लोकांचे मत आहे. या फंडाचे मुलभूत तत्व Disruption मुळे संधी मिळालेल्या कंपनीमध्ये जी वाढ होणार आहे त्या वाढीचा फायदा आपल्या गुंतवणूकदारांना करून देणे हा आहे.

तसेच हा Global स्वरूपाचा FUND असल्याने जागतिक स्तरावरील वर नमूद केलेल्या निकषांच्या आधारे ज्यांना किंवा ज्या उद्योगांना फायदा मिळणार आहे त्या उद्योगामध्ये आपली गुंतवणूक करण्याचे धोरण राबविणे आणि त्यातून होणारा फायदा आपल्या गुंतवणूकदारांना देणे असाही आहे.
या फंडातील गुंतवणूक मुखत्वे खालील Themes वर आधारभूत असणार आहे.
Fintech, Digitalization, E-commerce , Environment, Healthcare, New Consumers, Communication, Automation आणि Food !

या फंडाचे फंड मॅनेजर हितेश दास व आर शिवकुमार हे असून १ वर्षाच्या आत गुंतवणूक redeem केल्यास त्यावर १ % Exit load लागू शकेल.यामध्ये गुंतवणूक करताना किमान ५००० हजार रुपये व त्यानंतर १ रुपयाच्या पटीने करणे आवश्यक आहे मात्र या फंडातील गुंतवणुकीला कोणतीही टॅक्स सवलत नसून हा NFO Open Ended Fund तील आहे.
यामध्ये गुंतवणूक करण्यास ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क करावा अशी विनंती !
प्रदीप जोशी 9422429103

अभिप्राय द्या!