सार्वभौम सुवर्णरोख्यांची चालू आर्थिक वर्षातील दुसरी मालिका येत्या सोमवारपासून गुंतवणुकीसाठी खुली होणार आहे. ज्यांना पहिल्या मालिकेत गुंतवणूक करता आली नाही, अशा गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा गोल्ड बॉंडमध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. येत्या सोमवारी २४ मे २०२१ रोजी खुली होणार आहे. २८ मे २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणूक करता येईल. गोल्ड बॉंडच्या दुसऱ्या मालिकेसाठी प्रती ग्रॅम ४८४२ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.

गोल्ड बॉंडमध्ये आठ वर्षाहून अधिक गुंतवणूक केली तर त्यावर कर आकारला जात नाही. या योजनेत गुंतवणूकदाराच्या खात्यावर दर सहा महिन्यांनी व्याज दिले जाते. या व्याजाच्या रकमेवर देखील टीडीएस आकारला जात नाही. त्यामुळे कर बचतीच्या दृष्टीने गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरत आहे.

गोल्ड बाॅंडसाठी आॅनलाईन अर्ज सादर करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रती ग्रॅम ५० रुपये सवलत देण्यात येणार आहे. डिजिटल इकॉनॉमीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून ही सवलत दिली जाणार आहे. सवलतीनंतर गुंतवणूकदारांना सोन्याचा भाव प्रती ग्रॅम ४७९२ रुपये असेल.

अभिप्राय द्या!