म्युच्युअल फंड कंपन्यांच्या व्यवस्थापनांतर्गत एकूण मालमत्ता ३२.४० लाख कोटी इतकी वाढली आहे. म्युच्युअल फंड उद्योगातील स्पर्धा देखील वाढत आहे. नुकताच आयसीआयसीआय प्रुडेन्शिलने एचडीएफसी म्युच्युअल फंडाला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. व्यवस्थापनांर्तगत सर्वाधिक मालमत्ता असणाऱ्या फंड कंपन्यांमध्ये एसबीआय म्युच्युअल फंड अव्वल स्थानी आहे.

आकडेवारीचा विचार केला तर पहिल्या स्थानावर एसबीआय म्युच्युअल फंड असून कंपनीकडे ५.११ लाख कोटींचा निधी (AUM) आहे. पाच लाख कोटींचा टप्पा पार करणारा एसबीआय म्युच्युअल फंड पहिली कंपनी आहे. तर त्याखालोखाल आता आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाने दुसऱ्या स्थावर झेप घेतली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलकडील एकूण निधी (AUM) ४.१३ लाख कोटी झाला आहे. तिसऱ्या स्थानावर एचडीएफसी म्युच्युअल फंडाची मालमत्ता ४.०७ लाख कोटी आहे.

अभिप्राय द्या!