देशातील दुसरे मोठे म्युच्युअल फंड घराणे आयसीआयसीआय प्रुडेन्शियलची योजना ‘अ‍ॅसेट अलोकेटर फंड ऑफ फंड्स’ची व्यवस्थापनअंतर्गत मालमत्तेने (‘एयूएम’) १० हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. साडेसतरा वर्षांपासून कार्यरत हा फंड हा सध्या म्युच्युअल फंड उद्योगातील सर्वाधिक वेगाने वाढणारा फंड असून, दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्याची मालमत्ता केवळ १८ कोटी रुपये होती.

दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल १०० पटींनी मालमत्ता वाढ साधून, आयसीआयसीआय प्रु. अ‍ॅसेट अलोकेटर फंड ऑफ फंड्सची मालमत्ता ३० एप्रिल २०२१ अखेर १०,७३१ कोटी रुपये झाली आहे. डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन धाटणीच्या या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदार विविध मालमत्ता वर्गात गुंतवणूक करू शकतात. यात समभाग, रोखे, सोने यांसारख्या मालमत्तांचा समावेश आहे. वर्ष २०२० च्या सुरुवातीस या फंडातून समभागात ४० टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक होती. जेव्हा करोनामुळे बाजारात घसरण झाली तेव्हा हे प्रमाण वाढवून ८३ टक्के करण्यात आले. म्हणजेच बाजारात घसरण असताना अधिक तर बाजारात तेजी असताना समभागांतील गुंतवणूक कमी केले जाते.

एप्रिल २०२१ पासून बाजारात तेजीची झुळूक कायम असल्याने फंडाचे समभागातील गुंतवणुकीचे प्रमाण कमी होऊन ३७ टक्क््यांवर आले. या गुंतवणूक धोरणाचा परिणाम म्हणून गत एक वर्षात या फंडाने ४२.७ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे

अभिप्राय द्या!