मोदी सरकारने १८ ते ५० वयोगटातील तरुणांसाठी जे चांगले निर्णय घेतले आहेत त्यापैकी “पंतप्रधान जीवन ज्योती विमा“ हा अत्यंत चांगला निर्णय आहे . पण अनेक बँक्समधून याची व्यापक स्तरावर प्रसिद्धी झालेली दिसत नसल्याने” धनलाभ च्या “अनेकांसाठी याची माहिती थोडक्यात देण्यात येत आहे .

ही एक मुदत विमा योजनाच आहे फक्त याचा हप्ता व मिळणारी रक्कम सरकारने ठरवली आहे. १८ ते ५० मधील कोणत्याही व्यक्तीला याचा हप्ता एकाच रकमेचा आहे, हे याचे वैशिष्ट्य आहे .व अत्यंत माफक अटी आहेत.

१८ ते ५० वय , बँकेत खाते , व ३३० रू हप्ता याच अटी !! आहे कि नाही चांगली योजना !

याची पूर्तता केल्यास अश्या माणसाचे कोणत्याही प्रकारे निधन झाल्यास रू. दोन लक्षची भरपाई मिळण्याची सोय याद्वारे केली आहे !!

या योजनेचा कालावधी १ जून ते 31 मे असा आहे व दरवर्षी नुतनीकरण 31 मे पूर्वी करणे आवश्यक आहे. एकाच व्यक्तीची अनेक बँक खाती असली तरी कुठल्याही एका खात्यातर्फे यामध्ये सहभागी होता येते . कोणताही कामगार, खाजगी क्षेत्रातील नोकर , असंघटीत नोकर किंवा घरेलू कामगार यांना ही योजना निश्चितच संरक्षण देणारी आहे .

 

अभिप्राय द्या!