गुंतवणुकीच्या अत्यंत गुंतागुंतीच्या जगात इंडेक्स फंड हे गुंतवणूकदारांसाठी वनस्टॉप सोल्यूशन असते. दीर्घकाळात बाजारात होणाऱ्या चढ उताराला सामोरे जाण्यासाठी कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने  कोटक निफ्टी-५० इंडेक्स फंड या लोकप्रिय निफ्टी-५० निर्देशांकांवर आधारीत large cap इंडेक्स फंडची घोषणा करण्यात आली. नवीन फंड ऑफर ३१ मे २०२१ ते १४ जून २०२१ या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली असणार आहे.

या फंडच्या माध्यमातून लोकप्रिय निफ्टी ५० निर्देशाकांमध्ये एकाच भाराने प्रतिनिधीत्व करणाऱ्या ५० लार्ज कॅप कंपन्यांमध्ये या फंडतर्फे गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना भारतातील सर्वात भक्कम कंपन्यांचा एक भाग होण्याची संधी मिळणार आहे.

दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी कोटक निफ्टी-५० इंडेक्स फंड हा वन स्टॉप सोल्यूशन आहे आणि पुढील काही दशकांमधील भारताच्या प्रगतीच्या वाटचालीमध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदारांना एक चांगला पर्याय आहे.

या फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे दीर्घकालीन एसआयपी सुरू करणे आणि तुमच्या बचतीमध्ये दरवर्षी जसजशी वाढ होत जाईल, तसतसे तुमच्या एसआयपीच्या गुंतवणुकीत वाढ करणे. ज्यांना लघुकालीन चढ उतारांवरून गुंतवणूक करायची नसून दीर्घकालीन गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले जाते त्यांच्यासाठी हा फंड आदर्श आहे.

अभिप्राय द्या!