नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीची सध्या वेळखाऊ असलेल्या नोंदणी प्रक्रियेला आता गती मिळणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत ‘नॅश’ सेवा आठवडय़ाचे सातही दिवस आणि दिवसाचे २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एसआयपीसाठी ‘नॅश’ (एनएसीएच) ची नोंदणी करण्यास किमान १४ दिवसांचा अवधी लागतो.

‘नॅश’चे व्यवस्थापन ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून केले जाते. सध्या हे काम बँक कामकाजाच्या दिवशी केले जाते. आठवडय़ाचे सातही दिवस आणि २४ तास ‘नॅश’ नोंदणी सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे नवीन ‘नॅश’ नोंदणीची प्रक्रिया २१ दिवसांऐवजी चार ते पाच दिवसांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ‘एसआयपी नोंदणीच्या टप्प्यांपैकी ‘नॅश’ नोंदणी हा सगळ्यात वेळखाऊ टप्पा आहे.

अभिप्राय द्या!