श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडने समभाग विक्रीतून भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. कंपनीचा आयपीओ सोमवार १४ जून रोजी होणार असून १६ जून २०२१ रोजी बंद होणार आहे. यासाठी प्रती शेअर ३०३ ते ३०६ रुपये प्रती शेअर किंमत पट्टा निश्चित करण्यात आला आहे.

हा समूह इंटरइमीजीएट आणि लॉंग स्टील उत्पादने जसे की आयरन पॅलेट, स्पंज आयरन, स्टील बायलेट, टीएमटी, रचनात्मक उत्पादने, वायर रॉड आणि फेर्रो अलॉय उत्पादनांचा उत्पादक आहे. त्याचे लक्ष्य विशेष स्टील वापराकरिता लागणारी हाय मार्जिन उत्पादने जसे की, कस्टमाईज बायलेट व विशेष फेर्रो अलॉयवर आहे. सध्या हा समूह आपल्या उत्पादन प्रकारांत वाढ करत असून पिग आयरन, ड्क्टल आयरन पाईप आणि अॅल्युमिनियम फॉईलमध्ये प्रवेश करतो आहे. या समुहाची प्रमुख क्षमता स्टील वॅल्यू चेन आणि ओडिशा तसेच पश्चिम बंगाल येथील रणनीतीत्मक निर्मिती प्रकल्पांमधील एकात्मिक कामकाजांवर केंद्रित आहे. पूर्व भारतामधील ही ठिकाणे रेल्वे, रस्ते मार्ग आणि बंदरांनी चांगल्याप्रकारे जोडलेली आहेत. रेल्वे सायडिंग आणि वीज प्रकल्पांच्या पायाभूत सुविधांचा आधार लाभलेला आहे. ज्याचा वापर कंपनीच्या कामांसाठी करण्यात येतो.

अभिप्राय द्या!