अदानी विल्मर ही खाद्यतेल आणि विविध खाद्य वस्तूंची उत्पादन करणारी कंपनी आहे. फॉर्च्युन या ब्रँड नावाने कंपनीचे खाद्यतेल आहे. अदानी विल्मरने २०२७ पर्यंत देशातील सर्वात मोठी खाद्य वस्तू उत्पादक कंपनी बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी कंपनीने जोरदार तयारी केली आहे. समभाग विक्रीतून ७००० ते ७५००० कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कंपनीची योजना सफल झाली तर अदानी विल्मर ही भांडवली बाजारात सूचिबद्ध होणारी अदानी समूहातील सातवी कंपनी ठरणार आहे. अदानी समूहातील ६ कंपन्यांपैकी ५ कंपन्यांचे बाजार भांडवल एक लाख कोटींहून अधिक आहे.

अदानी समूहातील सहा सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १०० अब्ज डॉलरवर गेले. अशा प्रकारची कामगिरी करणारा अदानी समूह तिसरा उद्योग समूह ठरला आहे. यापूर्वी टाटा समूह आणि रिलायन्स ग्रुपला अशी कामगिरी करता आली आहे. अदानी समूहातील सूचिबद्ध कंपन्यांमध्ये अदानी एन्टरप्राइसेस , अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन , अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी या सहा कंपन्यांचा समावेश आहे.

अभिप्राय द्या!