वाहन उत्पादकांना मोठ्या अभियांत्रिकी, मिशन क्रिटीकल ऑटोमोटिव्ह सिस्टीम आणि सुट्या भागांची डिझाईन, निर्मिती आणि पुरवठा करणाऱ्या सोना काॅमस्टार भांडवल उभारणीचा निर्णय घेतला आहे. प्राथमिक बाजारात समभाग विक्री करुन कंपनी भांडवल उभारणी करणार आहे.

सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फॉरजिंग्स लिमिटेडचा आयपीओ १४ जून २०२१ रोजी खुला होणार असून १६ जून २०२१ पर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज सादर करता येतील. या प्रस्तावासाठी प्रती इक्विटी शेअर २८५ ते २९१ रुपये असा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा एकूण आकार ५५५० कोटीएवढा असून यामध्ये ३०० कोटींच्या नव्या इक्विटी शेअरची विक्री केली जाणार आहे. विक्रेता समभागधारक, सिंगापूर VII टॉपको III पीटीई लिमिटेडकडून इक्विटी शेअरची ऑफर फॉर सेल सरासरी ५२५० कोटींची राहील. ताज्या प्रस्तावातून मिळणाऱ्या रकमेचा विनियोग कंपनी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांशिवाय २४१.१२ कोटी नमूद असलेल्या कर्जाचा पुनर्भरणा किंवा आगाऊ भरणा करण्यासाठी करेल.

ही कंपनी वेगाने वाढणाऱ्या जागतिक इलेक्ट्रीक वेहिकल (इव्ही) बाजारपेठांमधील अग्रगण्य पुरवठादार असून आर्थिक वर्ष २१ दरम्यान बॅटरी ईव्ही मार्केटमधून निर्माण होणारा महसूल १३.८ टक्के असेल आणि मायक्रो हायब्रीड / हायब्रीड मार्केटमधून निर्माण होणारा महसूल २६.७ टक्के असेल. २०२० कॅलेंडर वर्षाकरिता बीईव्ही डिफरेन्शीयल असेंब्लीजचा ग्लोबल मार्केट शेअर ८.७ टक्के होता.

अभिप्राय द्या!