देशातील म्युच्युअल फंड गंगाजळीत महिन्याभरात जवळपास ६० लाख कोटींची भर पडली आहे. परिणामी मेअखेरीस फंड कंपन्यांचे मालमत्ता व्यवस्थापन ३३.०५ लाख कोटी रुपये अशा विक्रमी टप्प्यावर पोहोचले आहे.

विविध ४० हून अधिक म्युच्युअल फंड घराण्यांकडून एप्रिल २०२१ मध्ये ३२.३८ लाख कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन होत होते. म्युच्युअल फंड खात्यांची संख्या १० कोटींवर पोहोचली आहे. फंड कंपन्यांकडील गुंतवणुकीच्या मेमधील चढ-उताराची आकडेवारी ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी) ने बुधवारी जाहीर केली. करोना-टाळेबंदीमुळे गुंतवणूकदारांची वित्तीय नियोजन शिस्त अधिक वाढली आहे.

अभिप्राय द्या!