आंध्र प्रदेशातील आरोग्य सेवा क्षेत्रातील हाॅस्पिटल साखळी असलेल्या Krishna medical sciences institute लिमिटेडने भांडवली बाजारातून निधी उभारण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) १६ जून २०२१ रोजी खुला होणार असून १८ जून २०२१ रोजी बंद होईल. या योजनेसाठी प्रती इक्विटी शेअर ८१५ ते ८२५ रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे.

आयपीओमध्ये २१४४ कोटींचे इक्विटी शेअर्स विक्री केले जाणार आहेत. यातील १६,००३,६१५ इक्विटी शेअर्सची विक्री जनरल अटलांटिक सिंगापोर केएच प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (“इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर”), ३८७,९६६ इक्विटी शेअर्सची विक्री डॉ. भास्करा राव बोलिनेनींद्वारे, ७७५,९३३ इक्विटी शेअर्सची विक्री, राज्यश्री बोलिनेनींद्वारे, ३८७,९६६ इक्विटी शेअर्सची विक्री बोलिनेनी रामनैय्या मेमोरियल हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडद्वारे (सर्व मिळून “प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”) होणार आहे.

या ऑफरमध्ये कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांद्वारे सबस्क्रिप्शनसाठी २०० दशलक्ष एकत्रित मूल्याचे शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय प्रस्तावामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शनमधील एलिजिबल एम्प्लॉयी बिडिंगमध्ये ऑफर प्राइसवर ४० रुपये सवलत देण्यात आली आहे.

अभिप्राय द्या!