nifty निर्देशांक शुक्रवारी ०.५२ टक्क्यांनी वाढून १५,८०० ची विक्रमी झेप मागे टाकत १५,८१७ वर पोहोचला.सेन्सेक्स ०.५७ टक्क्यानी वाढून या पूर्वीची ५२५१६ ची झेप मागे टाकून ५२,५९७ वर पोहोचला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभागाच्या पाठबळावर मार्केटने आजवरचा उच्चांक गाठला आहे. शिवाय कंपन्यांनी ३१ मार्च २०२१ रोजी पूर्ण होणार्‍या तिमाहीत चांगले उत्पन्न नोंदवले आहे.

निफ्टीसाठी नजीकच्या काळात १५८४० अंकांची पातळी गाठेल. तसे झाले तर १६००० अंक फार दूर नाही, असे एलकेपी सिक्युरिटीज रोहीत शिंगरे यांनी सांगितले. सध्या बाजारात तेजी असली तरी निफ्टी १५९५० ते १६०५० अंकांपर्यंत गेल्यास गुंतवणूकदारांनी नफा बुक करावा, असा सल्ला कोटक सिक्युरिटीजचे गुंतवणूक विश्लेषक श्रीकांत चौहान यांनी दिला. भारतात करोनाची लाट ओसरत असून अनलाॅकची प्रक्रिया सुरु झाली आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. करोना लसीकरण, परदेशी गुंतवणुकीचा ओघ , आशियातील तेजीचे पडसाद भांडवली बाजारावर उमटतील.

अभिप्राय द्या!