डोडला डेअरीचा आयपीओ  १६ जून २०२१ रोजी खुली होणार आहे. या ऑफरचा प्राइस बॅण्ड प्रति इक्विटी शेअर ४२१ ते ४२८ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. किमान ३५ इक्विटी शेअर्स व त्यानंतर ३५ च्या पटीत इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे. ‘आयपीओ’तून ५२० कोटी उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

डेअरी उद्योगात दक्षिण भारतातील आघाडीची कंपनी म्हणून डोडला डेअरीची ओळख आहे. ३१ मार्च २०२१च्या आकडेवारीनुसार कंपनीचे दररोजचे दूध संकलन १० लाख ३० हजार लीटर इतके आहे. देशातील इतर डेअरी कंपन्यांच्या तुलनेत इतक्या मोठ्या प्रमाणात दैनंदिन दूध संकलन करणारी डोडला डेअरी लिमिटेड दुसरी मोठी कंपनी आहे. कंपनीचा केनिया आणि युगांडासारख्या आफ्रिकन देशात देखील व्यवसाय आहे.

आयपीओमध्ये ५०० दशलक्ष रुपये एकत्रित मूल्याचे ताजे जारीकरण (फ्रेश इश्यू) आहे आणि विक्रीसाठीचा प्रस्ताव १०,९८५,४४४ इक्विटी शेअर्सपर्यंत आहे. विक्री प्रस्तावामध्ये टीपीजी डोडला डेअरी होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या इन्व्हेस्टर सेलिंग शेअर होल्डर ९,२००,००० इक्विटी शेअर्सचा, डोडला सुनील रेड्डींच्या ४१६,६०४ इक्विटी शेअर्सचा आणि डोडला फॅमिली ट्रस्टच्या १,०४१,५०९ इक्विटी शेअर्सचा तसेच डोडला दीपा रेड्डींच्या ३२७,३३१ इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

अभिप्राय द्या!