पतंजली आयुर्वेदकडून झालेल्या संपादनातून खाद्य तेल क्षेत्रातील अग्रणी कंपनी रुची सोयाने बाजार नियंत्रक ‘सेबी’कडे समभागांच्या खुल्या विक्रीमार्फत (फोलो-ऑन पब्लिक ऑफर – एफपीओ) ४,३०० कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे.

कोणत्याही सूचिबद्ध कंपनीत सार्वजनिक समभाग मालकी ही किमान २५ टक्के असणे आवश्यक असल्याच्या ‘सेबी’च्या नियमाचे पालन करण्यासाठी कंपनीला ही समभाग विक्री आवश्यक ठरली आहे. सध्याच्या घडीला प्रवर्तक गटाची कंपनीतील भांडवली हिस्सेदारी ९८.९० टक्के इतकी आहे. पुढील महिन्यात भांडवली बाजाराला धडक देणे अपेक्षित असलेल्या या भागविक्रीतून प्रवर्तकांचा कंपनीतील ९ टक्के भांडवली हिस्सा सौम्य होईल. रुची सोयाकडे प्रवर्तकांचा हिस्सा आणखी कमी करून नियमानुसार ७५ टक्के अथवा त्याखाली आणण्यासाठी आणखी तीन वर्षांचा कालावधी उपलब्ध आहे.

अभिप्राय द्या!