भांडवली बाजारात आज नफेखोरीने सेन्सेक्स आणि niftyत घसरण झाली आहे. आज बुधवारी सेन्सेक्स 271 अंकांची घसरण झाली. तर निफ्टीमध्ये 101अंकांची घसरण झाली आहे. आजच्या सत्रात अदानी समूहाच्या शेअरमधील पडझड कायम आहे.

आज बाजारात अदानी ग्रीन २ टक्के, अदानी एन्टरप्राईज १.२ टक्के, अदानी टोटल गॅस ५ टक्के, अदानी ट्रान्समिशन ५ टक्के, अदानी पोर्ट ४ टक्के आणि अदानी पॉवर ५ टक्क्यांनी घसरले आहेत. सोमवारी या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. आज देखील बहुतांश शेअरला लोअर सर्किट लागले आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

आजच्या सत्रात धातू क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली आहे. यामुळे मागील काही महिने तेजीत असलेल्या धातू क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण झाली आहे. सेल, जिंदाल स्टील, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्थान कॉपर, हिंदुस्थान झिंक या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

अभिप्राय द्या!