श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडच्या समभाग विक्रीला प्राथमिक बाजारात दमदार प्रतिसाद मिळाला आहे. या आयपीओसाठी १२१.४३ पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. पुढील आठवड्यात कंपनीकडून शेअरचे वाटप केले जाण्याची शक्यता आहे. आयपीओला मिळालेला प्रतिसाद पाहता हा शेअर इश्यू प्राईसच्या ५० ते ५५ टक्के चढ्या दराने सूचिबद्ध होईल, असा अंदाज आहे.

कंपनीकडून २१ जून रोजी गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप (अलॉटमेंट) केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर २२ जून २०२१ रोजी गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. आयपीओमध्ये अलॉटमेंट मिळालेल्या भाग्यवान गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात २३ जून २०२१ रोजी शेअर हस्तांतर केले जाणार आहेत. २४ जून २०२१ रोजी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडचा शेअर सूचिबद्ध होणार आहे.

अभिप्राय द्या!