इन्फोसिसकडून ९२०० कोटींच्या शेअर पुनर्खरेदीला २५ जूनपासून सुरुवात होणार आहे. कंपनीकडून प्रती शेअर कमाल १७५० रुपयांचा भाव दिला जाणार आहे.

१९ जून रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात सभासदांनी ९२०० कोटींच्या शेअर पुनर्खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर कंपनीने २५ जूनपासून ही प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. खुल्या बाजारातून शेअरची पुनर्खरेदी करेल, असे कंपनीनं म्हटलं आहे. आज बीएसईवर इन्फोसिसचा शेअर ०.५९ टक्क्यांच्या घसरणीसह १५०२.८५ रुपयांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात इन्फोसिसचा शेअर १५०३. १५ रुपयांवर स्थिरावला. त्यात ०.५८ टक्के किंचित घसरण झाली.

निर्धारित उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत किंवा २४ डिसेंबर २०२१ या अंतिम तारखेपर्यंत हा कार्यक्रम सुरु राहील, असे कंपनीने म्हटलं आहे. यात ५,२५,७१,४२८ शेअरची पुनर्खरेदी केली जाणार आहे.

अभिप्राय द्या!