गुंतवणूकदारांना लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये गुंतवणुकीची संधी देणाऱ्या फ्लेक्झीकॅप फंडाची आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाने घोषणा केली. ICICI Flexycap fund २८ जून २०२१ रोजी खुला होणार असून १२जुलै २०२१ पर्यंत त्यात गुंतवणूक करता येणार आहे. यामध्ये किमान ५००० रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे.

इक्विटी म्युच्युअल फंड उद्योगात फ्लेक्झीकॅप म्युच्युअल फंड दुसरी लोकप्रिय गुंतवणूक योजना म्हणून नावारूपाला आली आहे. ही योजना सातत्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करत आली आहे. या योजनेत फंड मॅनेजरला गुंतवणूक निधी लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉल कॅप या तीन प्रकारात गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल फ्लेक्झीकॅप इन हाऊस मार्केट कॅप अॅलोकेशन या धोरणाचा अवलंब करते. त्याशिवाय अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म घटक आणि बिझनेस सायकल याचाही गुंतवणूक करताना विचार केला जातो. गुंतवणुकीसाठी पोषक तरलता असलेलं धोरण या फंडाकडे आहे.

अभिप्राय द्या!