आदित्य बिर्ला सनलाईफ बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाने एक वर्षात ३४.५८ टक्के परतावा दिला आहे. ३ वर्षात या योजनेने गुंतवणूकदारांना १२.८८ टक्के रिटर्न दिला आहे. दरमहा १० हजारांची नियोजनबद्ध गुंतवणूक केल्यास या फंडाने २१ वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. या फंडाची कामगिरी पहिली तर एप्रिल २००० मध्ये या फंडात दरमहा १० हजारांची एसआयपी केली असल्यास आजच्या घडीला त्याचे मूल्य १.०३ कोटी इतके प्रचंड वाढलेले असेल.

मागील काही सत्रात बाजारात अनेक चढ उतार दिसून आले आहेत. अशा अनिश्चित वातावरणात बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे . या फंडातील निधी योग्य प्रकारे विभागून गुंतवला जातो. आदित्य बिर्ला सनलाईफ बॅलन्स अॅडव्हान्टेज फंडाने बॅलन्स फंड श्रेणीत चांगली कामगिरी केली आहे. या फंडाने चांगल्या दर्जाचे इक्विटी शेअर आणि देत पर्यायाची निवड केलेले आहे. त्यामुळे या योजनेमध्ये सातत्य आहे.

अभिप्राय द्या!